ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा song lyrics upasna Sangeet
ख्रिस्ती बांधवांचा गोड प्रीती मेळा भक्ती भाव भोळा पाहीं देवा ... १ आवडे तुला रे नाद गायनाचा टाळ मृदूंगाचा नाही वीट ... २ नाचले तुझे ते थोर साधूसंत तुझ्या कीर्तनांत ओढी आम्हां …. ३ रंगू दे आम्हांला रिंगणांत गोल गाऊं दे अमोल प्रेमगीत ... ४ गोड गाणीं गातां होऊं पायें लीन गाऊं या मिळून देवबापा ... ५